जीएसटी दरवाढीचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही : निर्मला सितारामन

119

मुंबई : एकीकडे मंदीच्या प्रभावामुळे अर्थव्यवस्थेला बेजार केले असताना भारत फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी कशी बनेल, सरकार आवश्यक उपाययोजना करत आहे. विविध संस्थांनी जीडीपीबाबत व्यक्त केलेले अंदाज पाहण्यात आपण वेळ दवडत नाही, असे सांगून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी दरवाढीचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. त्यामुळे कोणतीही वस्तू महागणार नाही, असे स्पष्ट केले.

भारताला फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवण्याची अपेक्षा आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजनाबाबत आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत त्या बोलत होत्या. या परिषदेत सीतारामन यांनी मंदी, बेरोजगारी, जीएसटी संकलन आणि राज्यांचा परतावा या मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे दिली.

सीतारामन म्हणाल्या की, आता वस्तू महाग होणार नाहीत. जीएसटी दरवाढीचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. या बदल्यात सरकार वस्तूंचा खप वाढण्यासाठी पावले उचलत आहे. लोकांच्या हातातील पैसा वाढवा यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. तसेच, जीएसटी संकलनात वाढ होत असून अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत आहे. महाराष्ट्र, केरळ सारख्या राज्यांनी जीएसटी परतावा लवकर मिळावा अशी मागणी केली आहे. त्यावर बोलताना सीतारामन यांनी सांगितले की राज्य सरकारांना जीएसटी परतावा देणे बाकी आहे. मात्र जीएसटी कर संकलनात घसरण झाल्याने हा परतावा देण्यास उशीर झाला आहे. जीएसटी परताव्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल असे त्यांनी सांगितले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here