अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सर्व्हिस, ट्रेड सेक्टरमधील तज्ज्ञांशी करणार चर्चा

एक फेब्रुवारी २०२२ रोजी केंद्र सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे. २०२२-२३च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधी अर्थमंत्री निर्मला सीतारमण शुक्रवारी दोन सत्रात विविध उद्योगांतील धुरणांशी बजेटपूर्व चर्चा करतील. पहिल्या सत्रात अर्थमंत्री सर्व्हिस आणि ट्रेड सेक्टरच्या प्रतिनिधींशी संवाद साधली. त्यानंतरच्या सत्रात उद्योग, पायाभूत सुविधा, हवामान बदल, पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असेल.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत व्हर्च्युअल पद्धतीने ही बैठक होईल. आगामी अर्थसंकल्पात २०२२-२३ मध्ये विविध विषयांवर लक्ष केंद्रीत केले जाईल. अर्थ मंत्रालयाने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्प २०२२-२३ बाबत १७ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत दोन सत्रांमध्ये विविध क्षेत्रातील प्रमुखांशी बजेटबाबत संवाद साधणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here