कोलंबो : परकीय चलनाच्या संकटामुळे आपल्या चलनात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर वाढत्या महागाईला नियंत्रित आणण्यासाठी श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांना मुख्य खाद्यपदार्थांच्या साठा जप्त करण्यासह त्यांच्या किमती नियंत्रणात आणण्याचे अधिकार देण्यासह आर्थिक आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी साखर, तांदूळ यांसारख्या किराणा मालाचे दर योग्य आणि पुरवठा नियमित ठेवण्यासाठी सार्वजनिक सुरक्षा अध्यादेशाअंतर्गत आणिबाणीची घोषणा केली. मध्यरात्रीपासून आणिबाणी लागू करण्यात आली आहे.
सरकारने निवृत्त सेनाप्रमुखांची आवश्यक सेवांसाठी आयुक्ताच्या रुपात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना व्यापारी आमि किरकोळ विक्रेत्यांकडून केलेला साठा जप्त करण्याचे अधिकार आणि या वस्तूंचे दर ठरविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
गोटाबाया यांच्या माध्यम प्रमुखांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार अधिकृत अधिकारी, तांदूळ, साखरेसह इतर आवश्यक खाद्य पदार्थांचा साठा खरेदीबाबत प्रक्रिया करून ते किफायतशीर दरात जनतेला उपलब्ध करुन देण्याबाबत पावले उचलतील. यात म्हटले आहे की, या वस्तू सरकारकडून ठराविक दरामध्ये अथवा बाजारातील अनियमितता रोखण्यासाठी आयात वस्तूंवरील सीमा शुल्काच्या दराच्या आधारावर उपलब्ध करुन दिल्या जातील.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link