जाणून घ्या, देशात किती आणि कुठे बंद आहेत साखर कारखाने ?

नवी दिल्ली : उसाची अतिशय कमी रिकव्हरी, आर्थिक अडचणी आणि इतर कारणांमुळे देशातील २५० साखर कारखाने बंद पडले आहेत. बंद पडलेल्या अडीचशे कारखान्यांमध्ये आठ कारखाने पंजाबमधील आहेत. यामध्ये फरीदकोट, तरनतारन, जीरा, बुढलाडा, मलौत, जगराओ, रखडा येथील सात सहकारी साखर कारखाने आणि पटरण येथील एका खासगी कारखान्याचा समावेश आहे.

टाइम्स ऑफ इंडियात प्रकाशित वृत्तानुसार, ग्रामीण विकास आणि ग्राहक व्यवहार, खाद्य आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ही माहिती दिली होती. देशात सद्यस्थितीत ७५६ साखर कारखाने आहेत. त्यापैकी २५० कारखाने बंद पडले आहेत. यामध्ये सर्वाधिक ६६ कारखाने महाराष्ट्रातील आहेत. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशमधील ३८, कर्नाटकमधील २२, तमीळनाडूतील १८ तसेच बिहारमधील १८ आणि गुजरातमधील १४ कारखान्यांचा समावेश आहे. हरियाणातील दोन कारखान्यांचा समावेश आहे. इतर राज्यांतही ६४ कारखाने बंद आहेत.
मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी सांगितले की, पुरेशा उसाचा अभाव, आधुनिकीकरणातील कमतरता, भांडवलाची अनुपलब्धता, उसाची खराब रिकव्हरी, चांगल्या व्यवस्थापनातील कमतरता, अतिरिक्त मनुष्यबळ, आर्थिक संकट आणि पुरेशा सिंचनाची कमतरता यामुळे कारखाने बंद पडले आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here