पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी, असे जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

पेट्रोल आणि डिझेलच्या दरासाठी आज, आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी, बुधवारीही दिलासा मिळाला. पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.आज सलग ३५ व्या दिवशीही इंधन दरात बदल झालेला नाही.

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रती लिटर आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत १०९.९८ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९४.१४ रुपये प्रती लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०४.६७ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रती लिटर आहे. तर चेन्नईत पेट्रोल १०१.४० रुपये आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रती लिटर आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलत असतात. सकाळी सहा वाजता हे दर बदलले जातात. पेट्रोल-डिझेलचा दर तुम्ही SMS च्या माध्यमातूनही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP लिहून शहराच्या कोड नंबरसह ९२२४९९२२४९ या क्रमांकावर तर BPCLचे ग्राहक RSP लिहून ९२२३११२२२२ या क्रमांकावर मेसेज पाठवून माहिती मिळवू शकतात. तर HPCLचे ग्राहक HPPrice लिहून ९२२२२०११२२ या क्रमांकावर मेसेज पाठवून दराची माहिती घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here