ओव्हरलोड वाहनांवर दंडाची कारवाई, मालवाहतुकीसाठी रेल्वे होणार स्वस्त

औरंगाबाद : अवजड माल वाहून करणाऱ्या ओव्हरलोड वाहनांवर आता दंडाची कारवाई होणार आहे. केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने लागू केलेल्या नव्या मोटार वाहन कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे ट्रक वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून, या कालावधीत रेल्वेच्या माध्यमातून मालवाहतूक सुरक्षित व्हावी यासाठी रेल्वेकडून मोठी सवलत मिळणार आहे.

अशा माल भाड्यावर 1 ऑक्टोबर ते 30 जून दरम्यानच्या काळात ‘बीजी‘ सीजन सरचार्ज 15 टक्के अधिभार आकारत असते. हा अधिभार लोखंड खनिज आणि पेट्रोलियम ऑईल अ‍ॅन्ड लुब्रीकेन्टस वगळता इतर माल वाहतुकीवर येणार्‍या 9 महिन्यांसाठी नसेल. कमीत कमी 20 मालडब्यांचा रेक आणि टू डेस्टिनेशन रेक म्हणजेच दोन वेगवेगळ्या स्थानकावर जाणारी एकच मालगाडी यावरही रेल्वे 5 टक्के अधिभार आकारत होती, तो आदेश मिळेपर्यंत रद्द करण्यात आला आहे.
यामध्ये मालवाहतूकदारांना रेल्वेची पावती इलेक्ट्रॉनिकरित्या दाखवून मालाची डिलीवरी घेता येणार आहे.

यापूर्वी कोणत्याही वस्तूचे दोनवेळा वजन करुन, जे वजन जास्त तेच ग्राह्य धरले जात होते. यापुढे मात्र दुसर्‍यांदा केलेले वजनच ग्राह्य धरण्यात येणार आहे. शिवाय आता पूर्ण प्रवासाचे अंतर गृहित धरुन भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा 35 टक्के भाडे आता कमी लागणार आहे. तसेच, रिकाम्या डब्ब्यांच्या वाहतुकीसाठी यापुढे 25 टक्के सूट देण्यात येणार आहे. पूर्वी रिकाम्या डब्ब्यांच्या वाहतुकीसाठीही रेल्वे रक्कम आकारत होती.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here