आग लागून ५० एकरांतील ऊस जळून खाक

98

नांदेड : लोहा तालुक्यातील डोंगरगावमध्ये दुपारी तीनच्या सुमारास ऊसाच्या शेतावरून गेलेल्या विजेच्या तारांमधील घर्षणाने उसच्या फडाला आग लागली. आग परिसरात फैलावून ४० ते ५० एकर ऊस जळून भस्मसात झाला.

या आगीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचन संच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. परिणामी शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here