गुजरातमध्ये केमिकल फैक्टरीमध्ये आग

वापी : गुजरातच्या वापी शहरामध्ये शनिवारी दुपारी एका केंमिकल फॅक्टरीमध्ये भीषण आग लागली. आगीची सूचना मिळताच आठ पेक्षा अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोचल्या.

फॅक्टरीमधून मोठ्या प्रमाणात धूर निघताना दिसून आला. सध्या अग्निशमन चे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कंपनीच्या आसपासच्या क्षेत्रातील लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे.

आगीचे लोट उसळल्यामुळे आकाशात काळे ढग दिसत आहेत. आग लागली तेव्हा फॅक्टरीमध्ये किती लोक होते याची माहिती अजून समोर आली नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here