विखे कारखान्यातील वीज निर्मिती प्रकल्पाला आग

अहिल्यानगर : प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्यात काल मंगळवारी दुपारी वीज निर्मिती प्रकल्पाला सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही अशी माहिती कारखान्याच्या सूरक्षा विभागाने दिली.

प्रवरानगर येथील विखे कारखान्याच्या वीज निर्मिती प्रकल्पाला आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. कारखान्यात यापूर्वीही एकदा वीज प्रकल्पाला अशीच भीषण आग लागून त्यामध्ये दोन कामगारांच मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here