कर्नाटकमध्ये साखर कारखान्याला आग

122

विजयपुरा: विजयपुरा जिल्ह्यातील बाबालेश्वर तालुक्यातील नंदी सहकारी साखर कारखान्यात सोमवारी भीषण आग लागली. या आगीत कारखान्यातील मोठा भाग सापडला. आग मोठी होती पण, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कारखान्यातील वाळलेल्या उसामुळे आग भडकल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेनंतर फायर अ‍ॅण्ड इमर्जन्सी सर्व्हिसेसच्या अग्निशामक कामगारांना आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागले. परिस्थितीशी सामना करण्यासाठी विजयपुरा, मुधोल आणि जामखंडी येथून अग्निशामक गाड्या आणल्या गेल्या. दुपारच्या सुमारास ही आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना तीन तास लागले.

बाबलेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेचे कारण शोधून काढण्यासाठी पुढील तपास सुरु आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here