साखर कारखान्याला आग; उडाला गोंधळ

1006

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

बरेली (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी

करनारपूर येथील किसान सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य मशिनरी हॉलमध्ये पडलेल्या साहित्याला आग लागल्याने मोठा गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांनी सावधगीरी बाळगत तेथून पळून गेल्याने जिवितहानी टळली. घटनास्थळी आलेल्या अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, मोठी दुर्घटना टळली.

साखर कारखान्याच्या मुख्य मशिनरी हॉलमध्ये बॉयलर हाउसही आहे. कारखान्याची स्टीम लाइनही येथूनच जाते. उसाच्या रसापासून साखर बनविणाऱ्या बहुसंख्य मशिन्स येथे आहेत. मशिनरी हॉलमध्ये खूप उंचावर टीन शेड आहे. त्याच्यावरील लोखंडी गडरवर अनेकदा बगॅस साचून राहते. कडक उन्हामुळे बगॅस वाळून गेले. आणि दुपारी याला आग लागली. काही क्षणातच धूर हॉलमध्ये पसरल्याने कर्मचाऱ्यांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यानंतर मशिनरी हॉलमध्ये गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांनी तेथून सुरक्षितस्थळी जाणे पसंत केले. कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक कलम रस्तोगी यांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर पुवाया आणि शाहजहांपूर येथून प्रत्येकी एक अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी आली. सलग दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मशिनरी हॉलमधील वरच्या शेडवर पोहोचण्याचे साथन नसल्याने पाण्याचा फवारा तेथे सोडण्यात अडचणी येत होत्या. आगीमुळे कारखाना पाच तास बंद राहिला. मात्र, आगीत मशिनरीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. मात्र, बगॅसला ही आग कशी लागली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. शेडच्या वरील बाजूला असणाऱ्या विजेच्या तारांत शॉर्टसर्किट झाल्याने आग फैलावली असावी असे कारखान्याचे सरव्यवस्थापक कमल रस्तोगी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here