आग लागल्याने अनेक शेतकर्‍यांच्या शेतातला उस जळून खाक

बिजनौर, उत्तर प्रदेश: शेरकोट नव्या गावात ऊसाच्या शेतात आग लागून हजारो एकर उस जळून खाक झाला. सूचना मिळाल्यानंतर अग्नीशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी गावकर्‍यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेची माहिती पोलीसांनाही देण्यात आली. शेतकर्‍यांनी साखर कारखान्याच्या अधिकार्‍यांना जळालेल्या ऊसाचा पुरवठा करण्यासाठीऊसाच्या पावत्या देण्याची मागणी केली आहे.

बृजपालसिंह, विजय पाल सिंह, मुन्नी देवी, हरीसिंह, हरदेव सिंह, दिनेश, हर स्वरुप सिंह प्रेमा, फत्तू, माया दवी आदी शेतकर्‍यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या शेतात कितीतरी एकर ऊस होता. त्यांच्या शेतात कशी आग लागली हे कळाले नाही. समजल्यानंतर लोकांना घेवून घटनास्थळी पोचले आणि तिथली आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश मिळाले नाही. एस ओ संजय कुमार पांचाल म्हणाले की, घटनेची सूचना मिळाल्यानंतर त्यांनी ठाण्याच्या फोर्सलाही आग विझवण्यासाठी पाठवले. पोलीसांनीही आग विझवण्याचा प्रयत्न केला.

साधनांशिवाय आगीवर नियंत्रण आणण्यासाठी पोचलेल्या पोलीसांचे म्हणणे आहे की, पोलीस आग विझवण्यासाठी तिथे पोचले पण त्यांच्याजवळ कोणतेही साधन नव्हते. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी ऊसतोड केल्यामुळे अग्निशमन दलाची गाडी सहजतेने शेतात पोचू शकली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here