सीतापूर : बिसवा साखर कारखान्याच्या पॉवर प्लांटमध्ये अज्ञात कारणांनी भीषण आग लागली. कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या दरम्यान गोंधळाचे वातावरण होते.
दि सेकसरिया साखर कारखान्याच्या परिसरातील पॉवर प्लांटमध्ये अचानक आग लागली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. कारखान्याचे ऊस विभागाचे महाव्यवस्थापक अनुप गुप्ता यांनी सांगितले की, आगीचे कारण समजू शकले नाही. किती नुकसान झाले आहे याचा आम्हीआढावा घेत आहोत. प्लांटमध्ये जीवीतहानी झालेली नाही. आगीनंतर कोणीही कर्मचारी कारखान्याच्या परिसरात नव्हता.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link