आठ एकर ऊस आगीत जळून खाक

उत्तरप्रदेश मध्ये आठ एकर ऊस आगीत जळून खाक

लखनऊ (उत्तरप्रदेश) :तारुन, ठाणा परिसरातील ग्रामसभा ऊंचगाव मजरे मंठा मध्ये रविवारी लागलेल्या आगीत ३ शेतकऱ्यांचे आठ एकर ऊस पीक जळून खाक झाले. बऱ्याच वेळानंतर गावकऱ्यांनी फायर बिग्रेड टीमच्या सहकार्याने आगीवर नियंत्रण मिळवले .

गावकरी संतोष कुमार, महेश प्रसाद आणि हीरा लाल मौर्य यांची शेते एकमेकाला लागून आहेत. रविवारी दुपारी १ वाजता ऊसामध्ये धूर दिसू लागला, लगेचच ज्वाळाही दिसू लागल्या. ही आग विझवण्यासाठी लोक घटनास्थळी पोहचू पर्यंत आग चांगलीच भडकली होती. याची सूचना फायर ब्रिगेडला दिली. फायर बिग्रेड चे एफएम दिनेश मिश्रा म्हणाले, सूचना मिळताच चालक राम विलास तथा एफएम संदीप यादव यांच्या बरोबर घटनास्थळी येऊन गावकऱ्यांच्या सहकार्याने आग नियंत्रीत केली. आग लागल्यामुळे संतोष व महेश चा दोन -दोन बिगे तर हीरालाल यांचा एक एकर ऊस जळाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here