भीमा पाटस साखर कारखान्याच्या गोडाऊनला आग, कोट्यवधींची साखर जळाली

वरवंड – पाटस (ता. दौंड) येथील भीमा-पाटस सहकारीसाखर कारखान्यातील साखरेच्या गोडाऊनला भीषणआग लागली. या गोडाऊनमध्ये असलेली 69 हजार 376 क्विंटल साखर जळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्यात यश आले आहे.

कारखान्याच्या 6 नंबरच्या गोडाऊनमधून 8 वाजण्याच्या सुमारास धुराचे लोट येताना कामगारांना दिसून आले. यामुळे कामगारांनी कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाशी संपर्क साधला. काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवान दाखल झाले आणि अग्निशमनच्या बंबाने आग आटोक्यात आणली.

मागील काही वर्षांतील गळीत हंगामातील एकूण 1 लाख 38 हजार 772 पोती साखर गोडाऊनमध्ये साठवणूक करण्यात आली होती. ती जाड ताडपत्रीच्या साह्याने झाकण्यात आली होती. संपूर्ण ताडपत्री जळाल्याने साखरेच्या पोत्यालाही आग लागली व त्यातील साखर बाहेर पडली. आग विझवण्यासाठी अग्निशमन बंबाने पाणी मारण्यात आले; पण साखरेच्या पोत्यात पाणी जाऊन नुकसान झाले आहे. मात्र, आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेची फिर्याद शशिकांत काळे यांनी दिली आहे.

पुणे जिल्हा बँकेचे अधिकारी प्रताप सिंह चव्हाण, भीमा पाटसचे अध्यक्ष आणि तालुक्याचे आमदार राहुल कुल, तसेच संचालक यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानी ची पाहणी केली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here