ऊसाच्या शेताला भीषण आग, २ एकर ऊस जळून खाक

कवर्धा : ऊसाच्या शेतात भीषण आग लागली. या घटनेत २ एकरातील पिक जळून खाक झाले. उपलब्ध प्राथमिक आकडेवारीनुसार, कवर्धा शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हरिनछपरा गावातील शेतकरी जैतराम गेंड्रे यांची अनेक एकर जमीनीत ऊस शेती आहे.

शॉर्ट सर्किटमुळे ऊसाच्या शेतीत भीषण आग लागली. या घटनेनंतर प्रचंड गोंधळ उडाला. अग्निशमन दल आणि ग्रामस्थांच्या मदतीने प्रचंड प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत दोन एकरातील ऊस पिक पुर्णपणे नष्ट झाले. शेतकऱ्याचे यामध्ये अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here