उसाच्या शेतात आग, पिक जळून खाक

116

बुलंदशहर : अहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बढपुरा जंगल परिसरातील उसाच्या शेताला अचानक आग लागली. या घटनेत दोन शेतकऱ्यांचे सुमारे १९ एकरातील ऊस पिक जळाले. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

या आगीत बढपुरा गावातील शेतकरी उमेशपाल सिंह यांच्या सुमारे १३ एकर शेतात आग पसरली. शेजारी शेतांमध्ये काम करणाऱ्या ग्रामस्थांनी जेव्हा आग पाहिली, तेव्हा आरडाओरडा करत त्यांनी गावात ही माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थ तातडीने शेताकडे धावले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. आग आटोक्यात आणेपर्यंत उमेशपाल सिंह यांचे १३ एकर आणि नीरपाल सिंह याच्या शेतातील सहा एकरमधील ऊस जळाला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहलीसदार कार्यालयाशी संपर्क साधून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here