ऊसाच्या शेताला आग, पाच एकर ऊस जळून खाक

294

बिजनोर : मंडावली परिसरातील मंझाडी गावातील जंगलालगतच्या ऊसाच्या शेताला पुन्हा आग लागली. सुमारे दहा एकर परिसरात आग पसरली. त्यामध्ये सर्व ऊस जळून खाक झाला.

मंडावली परिसरातील मंझाडी गावातील हरफूल सिंह यांचे पाच एकर आणि राहतपूरचे रहिवासी अश्फाक यांचा पाच एकर ऊस आगीत भस्मसात झाला. एका मोटारसायकलस्वाराने मंझाडी गावात येऊन आगीची माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी जंगलाकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी ट्रॅक्टर आणि पाण्याच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवले.

मंझाडी जंगल परिसरात सातत्याने आगी लागत आहेत. दोन दिवसांपूर्वी गावातील मुन्नू यांच्या दोन एकर उसाला आग लागली होती. आग लागण्याचे कारण समजू शकले नाही. महेंद्र सिंह, नरेंद्र सिंह, रतिराम, नरेश, राहुल, रॉबिन, शुभम, ओमपाल, धर्मपाल, मेवा, सरिता, विनोद देवी, संतोष देवी, चंद्रोदेवी आदींनी आग आटोक्यात आणण्यास मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here