रुस च्या लसीला मोठी मागणी, भारतासह 20 पेक्षा अधिक देश मागवणार करोडो डोस

रुस ची कोरोना लस ‘स्पूतनिक वी’, ची वीस पेक्षा अधिक देशांनी मागणी केली आहे. रुसी डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड चे प्रमुख किरिल दमित्रीवे यांच्या मतानुसार, वीस देशांनी लसीच्या करोडो डोसची मागणी केली आहे. किरिल यांच्यानुसार, मागणी करणार्‍यांमद्ये लैटिन, अमेरिकी मध्य पूर्व आणि काही एशियाई देश सामिल आहेत. काहीबरोबर डीलही झाली आहे. त्यांनी हेदीखील सांगितले की, तिसर्‍या टप्प्यातील ट्रायल यूएई आणि सौदी अरब सह इतर देशांमद्ये होईल.

पाच देशांमध्ये 50 करोड डोस बनतील. किरिल यांनी सांगितले की, रुस आता विदेशी सहयोगींच्या मदतीने पाच देशांमध्ये प्रत्येक वर्षी वैक्सीन च्या 50 करोड डोस तयार करणार. त्यांनी सर्व देशांना अपील केले की, त्यांनी उच्च गुणवत्तेची आणि सुरक्षित लस आपल्या लोकांना लावून त्यांचे जिव वाचवण्यासाठी पुढे यावे.

दोन वर्षापर्यंत या लसीचा परिणाम राहणार आहे. आरोग्यमंत्री मिखाइल मुरास्खो यांनी दावा केला की, ज्याला लस टोचली जाईल तो दोन वर्षा पर्यंत कोरोनापासून पूर्णपणे सुरक्षित राहणार आहे. उपपंतप्रधान तात्याना गोवकोवा यांनी सांगितले की, डॉक्टरांना ही लस या महिन्यापासून देण्यास सुरुवात होईल. गामालेया इन्स्टीस्ट्युट चे निदेशक प्रा. एलेक्जेंडर गिंटसबर्ग यांनी मे मध्ये सांगितले होते की, ते आणि संशोधक यांनी स्वत: या लसीचे परीक्षण केले आहे.

Audio Player

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here