सोळंके साखर कारखान्याकडून पहिला हप्ता प्रति टन २७०० रुपये जमा : चेअरमन विरेंद्र सोळंके

माजलगाव : लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याचा २०२३-२४ चा ऊस गळीत हंगाम जोमाने सुरु आहे. कारखान्यातर्फे ६/११/२०२३ ते २०/११/२०२३ या कालावधीत गाळपास आलेल्या ऊस बिलाचा पहिला हप्ता प्रति मे.टन २७०० रुपयाप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन विरेंद्र सोळंके यांनी दिली.

चालू गळीत हंगामामध्ये साखर संघाचे उपाध्यक्ष, आ. प्रकाशदादा सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली गाळप हंगाम गतीने सुरु असून ३/१२/२०२३ अखेर २८ गाळप दिवसामध्ये १,२८६५० मेट्रिक टन उसाचे गाळप करुन ८.८९ टक्के सरासरी साखर उता-याने ५१,७०० विंवटल साखरेचे उत्पादन घेण्यात आलेले आहे. इथेनॉल व को.जन प्रकल्पातून आजअखेर २४८०८८४ लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले असून ६२,४६,१९४ युनीट विजेची विक्री करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here