फिचकडून जीडीपीच्या अनुमानात घट

नवी दिल्ली : पतमानांकन देणार्‍या फिच संस्थेकडून भारताच्या जीडीपीच्या वृद्धिदराबाबतच्या अनुमानात घटच दर्शवली आहे. चालू आर्थिक वर्षात भारताच्या जीडीपीचा वृद्धिदर 4.6 टक्क्यांवर सीमित राहील, असे फिचने म्हटले आहे. तसेच मध्यम मुदतीतील वाढीचा विचार केल्यास भारताची स्थिती आजही चांगली आहे, असे फिचच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील दुसर्‍या कार्यकाळात करण्यात आलेल्या उपाययोजनांची फिचने नोंद घेतली आहे. विदेशी गुंतवणुकीतील वाढ, सरकारी बँकांचे विलीनीकरण, व्यवसाय सुलभता आदी निर्णयांचे त्वरित नव्हे तर दूरगामी परिणाम दिसून येतील, असे निरीक्षण फिचने नोंदवले आहे. पुढील दोन वर्षांमध्ये भारताच्या जीडीपीच्या दरात वाढ होईल. 2020-21 व 2021-22 या आर्थिक वर्षांमध्ये भारताच्या जीडीपीचा वृद्धिदर अनुक्रमे 5.6 व 6.5 टक्क्यांवर पोहोचेल, असा अंदाज फिचने व्यक्त केला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here