मढौरा साखर कारखान्यात चोरी करणाऱ्या पाच जणांना अटक

मढौरा : स्थानिक पोलिसांनी मढौरा साखर कारखान्यातून लोखंड आणि इतर वस्तू चोरण्याच्या आरोपाखाली पाच चोरट्यांना अटक केली आहे. पोलिसांनी तपासादरम्यान त्यांच्याकडून चोरीला गेलेले लोखंड आणि इतर वस्तूही जप्त केल्या आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पोलिसांनी सांगतिले की, मढौरा साखर कारखान्यातून लोखंड आणि इतर वस्तू चोरीच्या आरोपाखाली नऊ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करुन आतापर्यंत करुन पाच जणांना अटक केली आहे. त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. उर्वरित संशयितांचा शोध घेण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. आतापर्यंत पन्नास क्विंटल वजनाचे लोखंड जप्त करण्यात आले आहे. इतर चोरट्यांच्या शोधासाठी छापेमारी सुरू आहे. अटक केलेल्या संशयित चोरट्यांमध्ये मनिष कुमार शर्मा (मढौरा), सुमन कुमार राय, कुन्दन कुमार चौधरी, सागर कुमार आणि भुअर कुमार (रिव्हिलगंज) यांचा समावेश आहे. इतर संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here