साखर कारखान्यांकडून गळीत हंगामासाठी ऊस पुरवठा धोरण निश्चित

119

आंबेडकरनगर : गळीत हंगाम २०२१-२२ साठीच्या तयारीला वेग आला आहे. ऊस तथा साखर आयुक्तांच्या निर्देशानुसार उसाचे तोडणी तसेच पुरवठा वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे. शेतकरीनिहाय पुरवठा वेळाही निश्चित केल्या जात आहेत.

जिल्हा ऊस अधिकारी हरिकृष्ण गुप्त यांनी सांगितले की, ठरवलेल्या वेळेपूर्वी शेतकरी आपला ऊस विकू शकत नाहीत. उत्तर प्रदेश साखर तथा ऊस आयुक्तांनी याबाबत निर्देश दिले आहेत ‌ एक हेक्टरवर ८५० क्विंटल, दोन हेक्टरवर १७०० तर पाच हेक्टर क्षेत्रावर शेतकरी ४२५० क्विंटल उसाची विक्री करु शकतात. याशिवाय वाढीव क्रमाने १३५०, २७०० आणि ६७५० क्विंटल ऊस विक्री करता येईल. शेतकऱ्यांचा दोन, तीन आणि पाच वर्षांचा सरासरी कोटा बेसिक मानला जाईल.
ठिबक सिंचनाद्वारे तसेच पूरक पिकांसमवेत लावणीला प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच ठिबक सिंचन पद्धतीने ऊस उत्पादक घेणाऱ्या शेतकऱ्यांना गाळपासाठी प्राधान्य दिले जाईल. ११ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत समिती स्तरावर प्रदर्शन आयोजित करुन सर्व्हेतील त्रुटी दूर केल्या जातील अशी माहिती सूत्रांनी दिली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here