पूरग्रस्तांचा आधार : कृष्णा साखर कारखाना

मुसळधार कोसळणार्‍या पावसामुळे कराड तालुक्यात महापूराची परिस्थिती निर्माण झाली असून, कृष्णा नदीच्या काठी असलेल्या खुबी, रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द, आटके, कार्वे अशा अनेक गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. या गावांमधील बहुतांश भाग पाण्याखाली गेल्याने लोकांना गाव सोडून इतरत्र आसरा घ्यावा लागला आहे. अशा पूरग्रस्त नागरिकांसाठी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना आधारवड बनला आहे.

कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यस्थळावर सुमारे 850 पूरबाधितांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी जेवण तर कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत.

अनेक गावातील पूरग्रस्तांसाठी कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी  कृष्णा कारखान्याच्या कार्यस्थळावर पूरग्रस्त आपत्ती निवारण केंद्र सुरू केले. त्यानुसार कारखान्याच्या कर्मचारी वर्गाने आणि डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पूरबाधित गावांतील लोकांना सुरक्षितपणे कारखाना कार्यस्थळावर आणण्याची कामगिरी बजावली. 850 हून अधिक पूरबाधित नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांचा समावेश आहे.

चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनीही आपत्ती निवारण केंद्राला भेट देऊन पूरग्रस्तांची विचारपूस केली. पूरग्रस्तांना लागेल ते सहकार्य करण्याच्या सूचना त्यांनी कारखाना प्रशासनाला दिल्या. कृष्णा कारखाना आणि अतुल भोसले युवा प्रतिष्ठानने घेतलेल्या या पुढाकारामुळे अनेक पूरग्रस्तांना मदत झाली असून, त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here