ब्राझीलला फटका : जोरदार पाऊस आणि भूस्खलनामुळे प्रचंड नुकसान, मृतांची संख्या १०० हून अधिक

रियो डी जनेरियो : ब्राझीलमध्ये सातत्याने सुरू असलेला पाऊस आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोरदार पाऊस आणि भूस्खलनामुळे मृतांच्या संख्येत गतीने वाढ झाली आहे. पूर्वोत्तर ब्राझीलमधील पर्नामबुको राज्यात जोरदार पावसामुळे मृत झालेल्यांची संख्या १०० झाली आहे. राजधानी रेसिफ आणि त्याच्या लगतच्या परिसरात कार्यरत बचाव पथकाने ही माहिती दिली.

याबाबत दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार किमान १६ जण बेपत्ता आहेत. तपासानंतर यातील १४ जण भूस्खलनात गाडले गेल्याचे आढळले आहे. दोघेजण पाण्यात वाहून गेले. तर ६००० हून अधिक लोकांना त्यांच्या घरांतून बाहेर काढण्यात आले आहे. भूस्खलनामुळे बचाव कार्यात अडथळे आले आहेत. जवळपास १४ पर्नबुको नगरपालिकांनी आपत्कालीन स्थिती जाहीर केल आहे. तर ३३ ने शेजारील राज्य अलागोसमध्ये असे केले आहेत. येथे पावसाने तिघांचा मृत्यू झाला असून १८,००० लोकांचे स्थलांतर झाले आहे. विभागाच्या सिव्हिल डिफेन्स अधिकाऱ्यांनी पेरनामबुकोमध्ये जोरदार पाऊस, भूस्खलनामुळे हजारो लोक विस्थापित झाल्याची माहिती ट्वीटरवर दिली आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे आणि अधूनमधून होत असलेल्या भूस्खलनाच्या घटनांमुळे लोकांना मदत करण्यात अडथळे येत आहेत. असे त्यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रपतींनी पूरग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. पूरग्रस्तांसाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल असे राष्ट्रपती कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here