कर्नाटकात साखरेच्या उत्पादनावर पुराचा परिणाम होण्याची शक्यता

Listen to this article

बेळगाव : महाराष्ट्रतील पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने इतका हाहाकार माजवला की जनजीवन विस्कळीत झाले. आता पुराने कर्नाटकालाही वेढले आहे. पुराने जिल्ह्यातील अनेक पिकांचे मोठे नुकसान केले आहे. अधिक पाण्याच्या भरावामुळे ऊसाचेही नुकसान झाले आहे.

बेळगाव जिल्ह्यात 40 लाख टन ऊसाचे नुकसान झाले. याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावर होईल, असे चित्र दिसत आहे. 2019-2020 च्या हंगामात साखरेचे उत्पादन जवळपास 32 लाख टन होईल असे वाटत असतानाच, पुरामुळे उत्पादनात घट होवू शकेल. महाराष्ट्रातही हिच स्थिती आहे, जिथे साखर उत्पादन 70 ते 75 लाख टन होईल असे वाटत होते, पण पुरानंतर साखरेच्या उत्पादनात 12 ते 15 टक्के घट होण्याची शक्यता आहे.

थकबाकी न मिळालेले ऊस शेतकरी सध्या वाईट परिस्थितीत आहेत आणि आपलं आयुष्य सुरळीत होण्यासाठी संघर्ष करत आहेत. पुराने केवळ त्यांच्या आयुष्यावरच परिणाम झाला नाही, तर हजारो करोड ची संपत्ती आणि पिके यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. फक्त महाराष्ट्रात तब्बल 10 हजार करोडचे नुकसान झाल्याचे अनुमान राजकीय स्तरावर काढण्यात आले आहे.

आतापर्यंत 1,058 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 18 लाख पेक्षाही अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे. 152 जिल्ह्यात पूरग्रस्तांसाठी 7,800 मदत शिबिरांची सोय करण्यात आली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here