बिहारमधील पूरात मृतांचा आकडा 29 च्या वर, अधिक पावसाचा अंदाज

बिहार: राज्यात विविध भागात संततधार पावसामुळे आलेल्या पुरातील मृतांचा आकडा 29 वर पोचला असल्याची माहिती बिहार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील बचाव आणि मदतकार्यासाठी दोन हेलिकॉप्टरसाठी भारतीय हवाई दलाला (आयएएफ) पाचारण केले आहे. डी वॉटरिंग मशीन देखील मागवण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी दुपारी राज्याच्या राजधानीतील पूरग्रस्त भागांचा दौरा करुन अधिक़ार्‍यांना यासंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या. मुख्यमंत्री म्हणाले, कालपासून काही भागात मुसळधार पाउस पडला असून त्यामुळे गंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

पाटण येथे येत्या काही दिवसात वादळी वार्‍यासह पाउस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here