ब्राझीलच्या बाहिया राज्यात पुराने हाहाकार, दहा जणांचा मृत्यू

347

ब्राझीलमधील बाहिया राज्यात जोरदार पाऊस आणि पूर आल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १०वर पोहोचली आहे. याबाबत सुरू असलेल्या बचाव मोहिमेतील पथकाने ही माहिती दिली आहे.

प्रादेशिक नागरी संरक्षण संस्थेच्या अहवालानुसार, पुरामुळे जवळपास २०,००० लोकांना आपल्या घरांतून बाहेर पडावे लागले आहे. या पुरामुळे जवळपास ५१ शहरांमध्ये आपत्कालीन स्थितीची घोषणा करण्यात आली आहे. जवळपास सहा दिवसांपूर्वी पाऊस सुर झाला होता. अतिरिक्त उष्ण कटिबंधीय चक्रीवादळामुळे ही स्थिती निर्माण झाली. आठवडाभरात हे चक्रीवादळ अधिक गतीमान झाले. वादळी वाऱ्यामुळे अनेक गावे आणि शहरांमध्ये भयानक स्थिती निर्माण झाली. परिणामी बचाव करणाऱ्या पथकांनाही तेथे पोहोचणे मुश्किल झाले आहे. रविवारी सैन्यदलाच्या अग्निशामक विभागाच्या दोन हेलिकॉप्टरच्या मदतीने २०० हून अधिक लोकांना वाचविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here