पाकिस्तानमध्ये पुरामुळे अन्न सुरक्षेला धोका

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये अन्न संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. आगामी रब्बी हंगामात गव्हाचे उत्पादन की कमी होण्याची शक्यता आहे. याचा अन्न सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. पाकिस्तान विनाशकारी पुरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अन्न सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. शरीफ यांनी ट्विट केले आहे की, हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती आणि जागतिक बाजारातील वाढत्या किमती यामुळे पौष्टिक अन्नाची जागतिक टंचाई भासण्याची शक्यता आहे. वाढत्या जागतिक गरीबी आणि हवामान बदलामुळे आपल्या जीवनाला अनेक प्रकारे नुकसान होत आहे.

Dawn वृत्तपत्राने सांगितले की, २०२१-२२ या दरम्यान देशात गव्हाच्या शेतीचे क्षेत्र २.१ टक्के घटून ८९,७६,००० हेक्टर राहिले आहे. एक वर्षापूर्वी हे क्षेत्र ९१,६८,००० हेक्टर होते.

पाकिस्तान सरकारच्या अधिकाऱ्यांनी उत्पादनात घसरणीसाठी पाण्याची कमतरता, लागवडीच्या कालावधीत दुष्काळी स्थिती, कमी खतांचा वापर आणि उष्णतेच्या लाटेला जबाबदार ठरवले आहे. डिसेंबरपासून मार्च २०२४ पर्यंत पुरग्रस्त स्थितीमुळे १४.६ मिलियन लोकांना आपत्कालीन अन्न सहाय्यतेची गरज भासेल. याशिवाय, वाढती महागाई, सिंचन प्रणालीचे नुकसान यामुळे स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) म्हणण्यानुसार, ऑगस्ट २०२२ मध्ये गहू, इतर अन्नधान्याच्या किमती उच्चांकी स्तरावर पोहोचल्या आहेत. पूरग्रस्त विभागात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (पीडीएमए) अहवालानुसार, २१ लाख हून अधिक घरांना फटका बसला आहे. ८ लाख लोक विस्थापित झाले आहेत. यापैकी ६,४४,००० लोक मदत केंद्रांत राहात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here