राजस्थानमध्ये मुसळधार पावसामुळे पुराची स्थिती; अ‍ॅलर्ट जारी

देशात सध्या मान्सून आपल्या उत्युच्च शिखरावर आहे. उत्तर आणि मध्य भारतात पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. जोरदार पावसामुळे लोकांना दिलासा मिळण्याऐवजी संकट वाटू लागले आहे. मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानचे काही भाग पुराच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे.

राजस्थानच्या हातौडी परिसरात सातत्याने पाऊस सुरू असल्याने पुराची स्थिती निर्माण झाली आहे. येथे शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले की, कोटा, बारा आणि झालावाड भागातील अनेक गावांमध्ये पावसामुळे पुरसदृश्य स्थिती आहे. प्रशासनाला मदत आणि बचाव कार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच स्थानिक पातळीवर मदत कार्य सुरू आहे.

गहलोत यांनी ट्विट केले आहे की, धौलपूरमध्ये चंबळ नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. भरतपूर परिसरातील जोरदार पावसामुळे काही भागात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. भरतपूर आणि धौलपूर प्रशासनाला अ‍ॅलर्ट करण्यात आले आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या पूर्व भागात जोरदार पाऊस झाला आहे. अनेक गावांमध्ये पाणी घुसले आहे. एसडीआरएफचे कमांडंट पंकज चौधरी यांनी धौलपूर, सवाई माधोपूर, करौलीत पथके तैनात करण्यात आली आहेत असे सांगितले. गेल्या २४ तासात राज्याच्या पूर्व भागात जोरदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अत्याधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे असे सूत्रांनी सांगितले.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here