केरळमध्‍ये पुरामुळे हाहाकार

तिरूवअनंतपुरम : केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून  मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या महापुरामुळं प्रचंड जीवीत व वित्त हानी झाली आहे. राज्‍यातील सबंध जनजीवन ठप्प झाले असून सर्वत्र हाहाकार माजला आहे. पुरातील बळींची संख्या १६७ वर पोहोचली असून पिके आणि वित्तहानीमुळे आठ हजार कोटींहून अधिक नुकसान झाल्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात येत आहे. हवामान विभागाने राज्यातील १३ जिल्ह्यांत रेड अॅलर्ट जाहीर केला आहे.
मुसळधार पाऊस आणि महापुरात आतापर्यंत एकूण १६७ जणांचा मृत्यू झाल्‍याची माहिती मुख्यमंत्री पी. विजयन यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांना दिली. राज्यात पूरग्रस्त भागात युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. त्यात लष्कर, हवाई आणि नौदलासह तटरक्षक दल आणि एनडीआरएफची ५२ पथकांचा समावेश आहे. एनडीआरएफची पाच पथके शुक्रवारी सकाळीच तिरुवअनंतपुरम येथे पोहोचली असून, बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफची आणखी ३५ पथकं रवाना झाली आहेत.
पथनमतित्ता जिल्ह्यातील रन्नी, अरनमुला, कोझेनचेरी गावातील हजारो ग्रामस्थ पुरात अडकले आहेत. मुख्यमंत्री विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्र्यांकडे आणखी मदत मागितली आहे.
SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here