बिहार आणि उत्तर पूर्वमध्ये जलप्रलय: ७० लाख लोकांचा जिव धोक्यात 44 जणांचा मृत्यू

पूर्वोत्तर आणि बिहारमधील काही भागांमध्ये पूर स्थिती गंभीर झाली असून, सोमवारी उत्तर प्रदेशात 44 लोकांचा मृत्यू झाला, तर उत्तर भारतातही अनेकजण मृत्युमुखी पडले. मान्सूनच्या पावसाची दीर्घ प्रतीक्षा आता संपली आहे. यावर्षी 28.8 मिमी पाऊस पडला. पुढील दोन ते तीन दिवसांत अधिक पाऊस अपेक्षित आहे.

हा महाप्रलय आसामपर्यंत पसरला असून राज्यातील 33 जिल्ह्यातील जवळपास 4.3 मिलियन लोक या प्रलयात अडकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री सरबंद सोनोवाल यांच्याशी पूर परिस्थितीबद्दल चर्चा केली.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, आसामच्या 1,53,211 हेक्टर शेती क्षेत्रावरील तब्बल 4 हजार 157 गावे या पूराच्या विळख्यात सापडली आहेत.

प्रसारमाध्यमांच्या अहवालानुसार, पूरग्रस्त नेपाळने संभाव्य जल जनित रोगांना रोखण्यास सहाय्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय एजन्सींकडून मदतीची मागणी केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here