केरळमध्ये पूर आणि भूस्खलनाने ३१ जणांचा मृत्यू, मदतीसाठी सैन्यदलाला पाचारण

केरळ : सतत सुरू असलेला पावसामुळे केरळला पुराचा फटका बसला आहे. विविध घटनांमध्ये आतापर्यंत मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ३१ झाली आहे. तर अनेकजण बेपत्ता आहेत. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मदतीसाठी सैन्यदलाला पाचारण करण्यात आले आहे. याशिवाय पुरात अडकलेल्यांना साहित्यही पोहोचविण्यात आले आहे. एनडीआरएफचे खास पथक तैनात असून पंबा जिल्ह्यातील काक्की धरणाचे दरवाजे उघडले जाणार आहेत. त्यामुळे खालच्या भागात पूरस्थिती गंभीर बनू शकते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. पावसाने निर्माण झालेल्या आपत्तीबाबत चर्चा करण्यात आली. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा झाली असून केरळमधील जोरदार पाऊस आणि भूस्खलनाबाबत विचार-विनिमय करण्यात आला असल्याचे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सर्वांनी सुरक्षित राहावे असे आवाहन मी करतो असे ट्वीट मोदी यांनी केले आहे.

तज्ज्ञांच्या मते, सातत्याने झालेला पाऊस आणि ढगफुटीच्या घटनांमुळे पूर आला असून भूस्खलन झाले आहे. सीयूएसएटीचे वैज्ञानिक एस. अभिलाश यांनी इडूक्की आणि कोटायाम जिल्ह्यातील सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रात दोन तासात ५ से.मी.पेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद घेत हा ढगफुटीचा प्रकार असल्याचे सांगितले.

दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केरळमधील पूरग्रस्त लोकांना आवश्यक ती सर्व मदत पुरवीली जाईल असे सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here