आसाममध्ये पुराचा कहर सुरुच, रस्त्यावर पाणीच पाणी, शेकडो लोकांना फटका

गुवाहाटी : आसाममध्ये खराब हवामानाचा कहर सुरूच आहे. राज्यात अनेक ठिकाणी संततधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी भूस्खलन झाले.

गुवाहाटीमध्ये मुसळधार पावसाच्या दरम्यान शहराच्या विविध भागांतून ताज्या भूस्खलनाची नोंद झाली, ज्यामुळे विविध ठिकाणी पाणी साचले.

गुवाहाटीच्या बाशिस्त भागात भूस्खलनामुळे एका घराच्या संरक्षक भिंतीचे नुकसान झाले.हे घर कल्पना कुमारी डेका या महिलेचे आहे. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मठघरिया परिसरातील आणखी एका घटनेत दरड कोसळून घराचे नुकसान झाले. आसाममध्ये गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरुच आहे. परिणामी राज्याच्या राजधानीतील सर्व प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here