अबुजा, नायजेरिया: नायजेरियाच्या शुगर मास्टर प्लॅन ला पुरामुळे मोठा धक्का बसला आहे. नॅशनल शुगर डेवलपमेंट काउंसिल (NSDC) चे उपसंचालक अहमद वज़िरी यांनी सांगितले की, नाइजर राज्यामध्ये कांजी हाईड्रो पावर डॅम मधून अचानक पाणी सोडल्यामुळे पूर आला आणि या पुराने (नाइरा)N60 बिलियन गुंतवणुकीच्या साखर परियोजनेला मोठा धक्का बसला आहे. 2018 मध्ये राष्ट्रपति मुहम्मदू बुहारी कडून बनवले गेलेले कार्यालय आणि आवासीय भवन देखील पुराच्या विळख्यात आले आहे.
राष्ट्रीय साखर विकास परिषदेचे कार्यकारी सचिव लतीफ बुसारी यांनी ही स्थिति चिंताजनक असल्याचे सांगितले. ते म्हणाले, हा साखर क्षेत्रासाठी एक मोठा झटका आहे. बुसारी म्हणाले, हा नैसर्गिक पूर नव्हता, पण यामुळे मोठया प्रमाणात ऊस पीकाचे नुकसान झाले आहे. बुसारी म्हणाले, परिषद पहिल्यापासूनच संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि कंपनी कडून नोंदवण्यात आलेले मोठे नुकसान कमी करण्यासाठी परिषदेकडून काम सुरू आहे.