उसासाठी ऑस्ट्रल तणनाशक लाँच करण्याची FMC कडून घोषणा

मुंबई : कृषी विज्ञान क्षेत्रातील कंपनी FMC India ने ऊस पिकासाठी नवे ऑस्ट्रल तणनाशक (Austral® herbicide) लाँच करण्याची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेल तणनाशक उसाच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर तण नियंत्रण करते, त्यातून चांगले पिक उत्पादन मिळते. भारत जगातील द्वितीय क्रमांकाचा सर्वात मोठा ऊस उत्पादक देश आहे. मात्र, दरवर्षी शेतकऱ्यांचे तणामुळे खूप मोठे नुकसान होते. आणि विविध प्रकारच्या तणांचे नियंत्रण करणे हे शेतकऱ्यांसमोरील मोठे आव्हान राहिले आहे.

ऑस्ट्रेल तणनाशक मातीच्या वरील थरावर सुरक्षात्मक आवरणाच्या रुपात काम करते. जे पिक वाढीच्या टप्प्यात तणांची वाढ होण्यापासून रोखते. परिणामी उसाच्या निरोगी रोपांची संख्या वाढते आणि निरोगी उसाच्या रोपांची संख्या अधिक मिळते. FMC India चे अध्यक्ष रवी अन्नावरापु यांनी सांगितले की, एफएमसीमध्ये मजबूत रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाद्वारे भारतीय शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या आव्हानांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले जातात. उसासाठीच्या ऑस्ट्रल तणनाशकाच्या माध्यमातून चांगले पिक उत्पादन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्हाला विश्वास आहे की, ऑस्ट्रेल तणनाशक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या चांगल्या पिक वाढीमध्ये त्याचे संरक्षण करेल आणि त्यांच्या उत्पन्नात सुधारणा करण्यास मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here