चीनच्या जागी लोकल सप्लायर्सकडून कच्चा माल खरेदी करत आहेत एफएमसीजी कंपन्या

नवी दिल्ली : गलवान खोर्‍यातील घटनेनंतर मोदी सरकारने आत्मनिर्भर भारताची घोषणा केली होती. याअंतर्गत वोकल फॉर लोकल ची अपील करण्यात आली. प्रत्येक सेक्टर मध्ये चीनसह इतर देशावरचे अवलंबित्व कमी करण्याची केलेली अपील आता आपला रंग दाखवत आहे. भारतातील मोठमोठ्या एफएमसीजी कंपन्या उदा. हिंदुस्थान यूनीलीवर, डाबर आणि गोदरेज कन्ज्यूमर यांनी कच्च्या मालासाठी चीनवरील निर्भरता कमी केली आहे.

या कंपन्यांनी आता लोकल कंपन्यांकडून कच्चा माल खरेदी करणे सुरु केले आहे. गोदरेज कन्ज्युमर चे सीईओ इंडिया एंड सार्क, सुनील कटारिया यांनी सांगितले की, आम्ही आता लोकल इंपोर्ट वर फोकस करत आहोत. त्यांनी हेदेखील सांगितले की, पूर्ण जगाचा चीन हा सर्वात मोठा सप्लायर आहे. अशामध्ये त्याला रिप्लेस करण्यात थोडा वेळ नक्कीच लागेल.
दशकांपासून चीन ग्लीसरीन, कलरिंग एजेंटस, हर्बल एक्सट्रेक्ट, पॅकेजिंग प्रॉडक्ट चा लीडर राहिला आहे. स्किन केअर, बाथ अ‍ॅन्ड बॉडी प्रॉडक्ट ही मोठ्या प्रमाणात निर्यात करत आहे. दोन महिन्यापूर्वी गलवान खोर्‍यातील घटनेनंतर अ‍ॅन्टी चाइना मध्ये गती येवू लागली. चीनवरील निर्भरतेला कमी करण्याच्या बाबतीत बायकॉट चायना मोहिमेने चांगलाच रंग दाखवला आहे.

जुलैमध्ये हिंदुस्थान यूनीलीवर ने सांगितले की, ते चीनवरील आपली निर्भऱता कमी करतील. कंपनीचे चेअरमन संजीव मेहता यांनी 87 व्या अ‍ॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये सांगितले की, कंपनी चीनकडून वार्षिक 429 करोड चा कच्चा माल आणि पॅकिंग मटेरियल आयात करते. आता आमचा फोकस ही निर्भरता कमी करण्याकडे आहे.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here