जिल्यात विस्थापित कामगारांना मिळणार भोजनाची सुविधा: जिल्हाधिकारी

पुणे : लॉकडाउनच्या दरम्यान जिल्हा प्रशासनातर्फे सुरु करण्यात आलेल्या 50 निवारागृहात 3 हजार 442 विस्थापित कामगार वास्तव्यास आहेत. त्याचप्रमाणे साखर कारखान्यांनी सुरु केलेल्या निवारागृहात 34 हजार 246 कामगार वास्तव्यास आहेत. सध्याच्या कठीण काळात स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनामार्फत तब्बल 91 हजार 938 विस्थापित कामगारांना भोजन देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राम नवले यांनी दिली.

नवले म्हणाले, लॉकडाउनच्या काळात विस्थापित कामगारांनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 24 तास तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात कामकाजासाठी दोन तहसिलदार, तीन नायब तहसिलदार आणि इतर सात कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

1 एप्रिल ते 3 एप्रिल दरम्यान या कक्षात विस्थापित कामगारांच्या एकूण 349 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 220 तक्रारींचे विभागामार्फत निराकरण करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी दिली.

कामगारांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी समन्वय अधिकारी म्हणून औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सह संचालक विजय यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बांधकाम मजूर, दुकाने व आयटी कंपन्यांमधील कामगारांच्या समस्यांकरीता कामगार उपायुक्त व्ही.सी. पनवेलकर यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here