गव्हाच्या उत्पादनात कोणत्याही प्रकारे घट येण्याची शक्यता नाही : सचिव संजीव चोपडा

नवी दिल्ली : केंद्र सरकारला गव्हाच्या उत्पादनात कोणत्याही प्रकारे घट होण्याची शक्यता वाटत नाही, असे केंद्रीय अन्न सचिव संजीव चोपडा यांनी गुरुवारी सांगितले. संजीव चोपडा म्हणाले की, देशात एकूण ११२ मिलियन टनापर्यंत उत्पादन होईल असे अनुमान आहे. आणि अतिशय वाईट स्थितीतही गव्हाच्या उत्पादनात नगण्य घसरण होण्याची शक्यता आहे.
चोपडा म्हणाले की, साखरेबाबत आमचे अनुमान आहे की, जवळपास ३८६ लाख टनाचे उत्पादन होईल. महाराष्ट्रात काही अज्ञात कारणांमुळे उत्पादनात थोडीफार घट होऊ शकते. आणि ही घट २ ते ४ लाख टनाची असू शकेल असा आमचा अंदाज आहे.

चोपडा म्हणाले की, पंजाब आणि हरियाणातील खराब हवामानामुळे गव्हाच्या पिकाचे नुकसान झाल्याचे वृत्त आले आहे. मात्र, खराब हवामानामुळे उत्पादनावर फारसा परिणाम होणार नाही. गेल्या दोन आठवड्यात तापमान कमी झाल्याचे दिसून आले आहे आणि आगामी दोन आठवडे उच्च तापमान असणार नाही या बाबीवर त्यांनी भर दिला. हा कालावधी गव्हाच्या पिकासाठी खुप अनुकूल आहे.

ते म्हणाले की, पंजाब आणि हरियाणात उत्पादनात थोडीफार घट दिसू शकते. त्याचा आढावा घेण्यात येत आहे. मात्र, देशाच्या इतर भागातील अधिक उत्पादनाचा आम्हाला लाभ मिळेल. खास करुन ज्या ठिकाणी पेरणी उशीरा होते अशा ठिकाणी चांगले उत्पादन होईल. चोपडा यांनी सांगितले की, या खास रब्बी हंगामात ३४२ लाख टन धान्य खरेदीचे उद्दिष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here