सलग २१ व्या दिवशीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

देशातील सरकारी तेल कंपन्यांनी आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. सलग २१ व्या दिवशीही दर स्थिर राहीले आहेत.

दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात या आठवड्यात तेलाच्या किमती मधील घसरण सुरूच राहिली. अमेरिकेत काल शेअर बाजार खुला झाल्यावर ब्रेंट क्रूडमध्ये घसरण होऊन तो ७०.६४ डॉलर प्रती बॅरलवर आला. आधीच्या दिवसाच्या तुलनेत हा दर ०.९१ टक्के कमी आहे.

देशांतर्गत बाजारपेठेतही ४ मे पासून पेट्रोल-डिझेलच्या दरात जोरदार वाढ करण्यात आली आहे. एकूण ४२ दिवसांमध्ये पेट्रोल ११.५२ रुपये आणि डिझेल ९.०८ रुपये महागडे आहे. सध्या १८ जुलैपासून पेट्रोल आणि १६ जुलैपासून डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये तर डिझेल ८९.८७ रुपये प्रती लिटर आहे. तर आर्थिक राजधानी दिल्लीत पेट्रोल १०७.८३ रुपये आणि डिझेल ९७.४५ रुपये प्रती लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०२.०८ आणि डिझेल ९३.०२ रुपये प्रती लिटर आहे. तर चेन्नईत पेट्रोल १०१.४९ आणि डिझेल ९४.३९ रुपये प्रती लिटर आहे. बेंगळुरुमध्ये पेट्रोल १०५.२५ आणि डिझेल ९५.२६ रुपये प्रती लिटर आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज सकाळी सहा वाजता बदल केले जातात. या दरांची माहिती एसएमएसच्या माध्यमातूनही मिळवता येते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here