सलग २३ व्या दिवशीही पेट्रोल-डिझेल दरवाढीने घेतली विश्रांती

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आज, ९ ऑगस्ट रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात बदल केलेला नाही. तेलाच्या दरवाढीपासून सलग २३ व्या दिवशीही दिलासा मिळाला आहे. आज देशभरातील विविध पेट्रोल, डिझेल पंपांवर जुन्या दरानेच पेट्रोल मिळत आहे. यापूर्वी १८ जुलै रोजी दरवाढ करण्यात आली होती. त्या दिवशी पेट्रोलमध्ये २९ ते ३० पैसे वाढ झाली होती.

आज राजधानी दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये आणि डिझेल ८९.८७ रुपये प्रती लिटर दराने विक्री सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर लवकरच कमी होऊ शकतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महानगरांतील तेलाचे दर पाहता दिल्लीत पेट्रोल १०१.८४ आणि डिझेल ८९.८७ रुपये प्रती लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल १०७.८३ रुपये आणि डिझेल ९७.४५ रुपये प्रती लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल १०२.४९ रुपये आणि डिझेल ९४.३९ रुपये प्रती लिटर दराने विक्री सुरू आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०२.०८ रुपये आणि डिझेल ९३.०२ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे.

देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. राजस्थानमधील श्री गंगानगरमध्ये सर्वाधिक महागड्या दराने पेट्रोल मिळते. यापाठोपाठ रत्नागिरी, परभणी, औरंगाबाद, जैसलमेर, गंगानगर, लेह, बसवाडा, इंदौर, जयपूर, दिल्ली, कोलकाता, पाटणा, चेन्नई, भोपाळ, ग्वाल्हेर, गुंटूर, काकिनाडा, चिकमंगळुर, शिवमोगा आणि लेह या शहरांचाही यामध्ये समावेश आहे. याशिवाय महानगरांमध्ये मुंबई, हैदराबाद, बेंगळुरूमध्येही पेट्रोल प्रती लिटर शंभर रुपयांपेक्षा अधिक दराने मिळते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here