महाराष्ट्रातील या शहरांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज, मुंबईतही सतर्कतेचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. दक्षिण कोकण आणि उत्तर कोकणात येत्या ३-४ दिवसांत मुसळधार ते अतिवृष्टी पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत मुंबईत ५० मिमी पावसाची नोंद झाली. आणखी काही दिवस हा पाऊस सुरूच राहणार आहे असे आयएमडीचे प्रमुख सुनील कांबळे यांनी सांगितले.

हवामान खात्याने महाराष्ट्रातील पावसाबाबत ताजे अपडेट दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कोकण आणि उत्तर कोकणात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.

शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगरात हजेरी लावली, त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. उपनगरातील गाड्या वेळापत्रकानुसार धावत असल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला, तर प्रवाशांनी सेवांमध्ये १५ मिनिटे उशीर झाल्याची तक्रार केली. गेल्या आठवडाभरापासून येथे हलका पाऊस पडत होता. मात्र सकाळपासूनच महानगरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांत शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) च्या प्रवक्त्याने सांगितले की, सायनमधील साधना विद्यालयाजवळ झाडे उन्मळून पडल्यामुळे परिवहन मंडळाने आपल्या बसेस सुमारे सहा मार्गांवर वळवल्या. गेल्या सप्ताहात मुंबईतील पावसाचा जोर कमी झाला आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण होते. या काळात हलका ते जोरदार पाऊसही झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here