चार आठवड्यांनंतर वाढला परकीय चलनसाठा

54

मुंबई : परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा भारतीय बाजाराकडे आपला मोर्चा वळवल्याचे दिसून आले. परिणामी देशाच्या परकीय चलन साठ्यातही वाढ झाल्याचे दिसून आले. २९ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात २.४ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. यापूर्वी गेले चार आठवडे हा चलनसाठा कमी झाला होता. २९ जुलै रोजी संपलेल्या सप्ताहाच्या अखेरीस दररोज शेअर बाजारात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या आठवड्यात एफआयआय हेच निव्वळ गुंतवणूकदार होते. रिझर्व्ह बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, २९ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा ५७३.८७५ अब्ज डॉलरवर पोहोचला. १५ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात, त्याच्या परकीय चलनाच्या साठ्यात ७.५४१ अब्ज डॉलरची घट झाली होती.

पंजाब केसरीमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, २२ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात चलनसाठा ५७१.५ अब्ज होता. ८ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात, परकीय चलनसाठा ८.०६२ अब्ज डॉलरने घसरून ५८०.२५२ अब्ज डॉलरवर आला. सरत्या आठवड्यात परकीय चलन साठ्यातील वाढीमध्ये परकीय चलन मालमत्तेमधील वाढीचाही समावेश आहे. याशिवाय सोन्याच्या साठ्यात वाढ झाल्याने परकीय चलनसाठा वाढला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जारी केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, आठवड्यात परकीय चलन मालमत्ता १.१२१ अब्ज डॉलरनी वाढून ५११.२५७ अब्ज डॉलर झाली आहे. परकीय चलनाच्या मालमत्तेमध्ये युरो, पौंड आणि येन यांसारख्या गैर-यूएस चलनांमधील मूल्यवृद्धीचा समावेश होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here