माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला संगूर साखर कारखान्याचा मुद्दा

बेंगळुरू : कर्नाटकमध्ये ३० ऑक्टोबर रोजी होत असलेल्या हानागल विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार गतिमान झाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षतेने सिद्धरामय्या यांनी संगूर साखर कारखान्याचा मुद्दा उपस्थित करून भाजपला कोंडीत पकडले आहे. हानागल पोटनिवडणूक जिंकणे हा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यांचा मूळ जिल्हा हावेरी आहे. बोम्मई यांनी येथे मायशुगर साखर कारखान्याच्या खासगीकरणाच्या मुद्यावर पडदा टाकला आहे. सरकार कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करेल असे सांगण्यात आले आहे.

Newindianexpress.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, तोट्यात चालणाऱ्या संगूर कारखाना दावणगिरीचे खासदार जी. एम. सिद्धेश्वर यांना लीजवर देण्यात आला. याबाबत सार्वजनिक रॅली आणि ट्विटरवर सिद्धरामय्या यांनी भाजपचे हानागलचे उमेदवार शिवराज सज्जनार यांच्यावर टीकास्त्र सोडताना सांगितले की जेव्हा ते कारखान्याचे उपाध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी तेथील पोतीही सोडली नाहीत. पैसे कमविण्यासाठी त्यांची विक्री केली. सहकार अधिनियम १९५६ अनुसार करण्यात आलेल्या चौकशीत ३३ लाख रुपये भरावेत असे तुम्हाला निर्देश दिले होते, अशी विचारणा सिद्धारामय्या यांनी सज्जनार यांना केली. ही बाब तुम्ही विसरला आहात का ? अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, सज्जनार यांनी यावर पलटवार करताना सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री असताना याच्या चौकशीचे आदेश का दिले नाहीत अशी विचारणा केली. तर सज्जनार यांच्या बचावासाठी पुढे आलेल्या बोम्मई यांनी काँग्रेसच्या कार्यकाळात कारखाना बंद पडला होता. मात्र, भाजप सरकारने उसाचे गाळप सुरू केल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here