माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या पुस्तकाचे आज प्रकाशन

पुणे : राज्याचे माजी साखर आयुक्त आणि निवृत्त आयएएस अधिकारी शेखर गायकवाड आणि साखर सहसंचालक मंगेश तिटकारे लिखित ‘इक्षुदंड ते इथेनॉल या पुस्तकाचे प्रकाशन 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता साखर संकुल येथे खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. ऊस आणि साखर उद्योगाचा पाच हजार वर्षांपासूनचा इतिहास शब्दबद्ध करणारे हे पुस्तक आहे. साखरेची उत्पत्ती आणि इतिहास, जागतिक साखर उद्योग, भारतीय साखर उद्योग, महाराष्ट्रातील सहकारी चळवळ, ऊस व साखरेचे उपपदार्थ आदी विषयांची सविस्तर मांडणी पुस्तकात करण्यात आली आहे.

गायकवाड यांची आजपर्यंत प्रकाशित झालेली पुस्तके अशी :  १) शेतक-यांनो.. जमिनी सांभाळता, २) कायदा माहितीचा अन् अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा, 3) Home Delivery Scheme of Foodgrains, ४) घरपोच धान्य योजना, ५) महसूल अधिका-यांच अर्धन्यायिक कामकाज, ६) शेतीचे कायदे, ७) फेरफार नोंदी, ८) शेतक-यांनो सावधान, ९) गोष्टीरुप जमीनव्यवहार नीति, १०) Land Rights and Mutations in Maharashtra, ११) प्रशासनाच्या नव्या वाटा, १२) स्पर्धेच्या….. पलीकडे, १३) Land Issues in India, १४) मिरज-लातूर जलदूत रेल्वे – एक भगीरथ प्रपन, १५) The Basics of Land Laws in Maharashtra, १६) Stories of Land Transactions १७) अग्रणी नदी पुनरुज्जीवन – एक भगिरथ प्रयत्न, १८) भूजल स्मरणिका, १९) एफ. आर. पी. (रास्त व किफायतशीर वर) माहितीपुस्तिका, २०) ऊसाच्या एफ.आर.पी. वसुलीसाठी महसुली वसुली प्रमाणपत्र (R.R.C.) माहिती पुस्तिका, २१) महाराष्ट्राची भूजलगाथा, २२) Beyond Competition, २३) साखर उदयोगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा FRP वर परिणाम, २४) Unending Questions of Land Disputes, २५) Legal Framework of Sugar Industry.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here