उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) नेते मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी गुरुग्राम येथील एका हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

गेल्या काही दिवसांपासून मुलायम सिंह यांची प्रकृती गंभीर बनली होती. २२ नोव्हेंबर १९३९ रोजी जन्मलेले मुलायम सिंह यादव हे उत्तर प्रदेशातील प्रमुख असे नेते आहेत, ज्यांनी तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. आणि केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री म्हणूनही काम केले.

ते १० वेळा आमदार आणि ७ वेळा खासदार म्हणून निवडले गेले होते. या वर्षी जुलै महिन्यात मुलायम सिंह यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचा फुफ्फुसातील संसर्गामुळे गुरुग्राममधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here