सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित चार रुग्ण

200

सांगली : सांगलीच्या वाळवा तालुक्यातून चार प्रवासी सौदी अरेबिया येथे उमराह देवदर्शनासाठी गेले होते. हे चौघे नुकताच प्रवास करून परतले होते.   त्यांचे रिपोर्ट आज जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून, या चारही प्रवाशांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 2 पुरुष आणि 2 महिला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे. चौघांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

संबंधित चौघांना मिरजेतील सिव्हील हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.  हे चारही जण सौदी अरेबियामध्ये उमराह येथे देवदर्शनासाठी गेले होते. 13 मार्चला सांगली जिल्ह्यात आले. 19 मार्चला रूग्णालयात दाखल करण्यात आले. 21 मार्चला नमुने तपासणी साठी पाठवले होते. सोमावारी (23 मार्च) रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत .जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी या चौघांना कोरोना झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मिरजेतील सिव्हील रूग्णालयात त्यांना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे.

तपासणीच्या अहवालानंतर ते कोणाच्या संपर्कात होते याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच पुढे घ्यावयाची खबरदारी प्रशासन पूर्णत: घेत आहे. कोणीही घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत परदेशवारी करून 490 व्यक्ती आलेल्या आहेत. यापैकी 422 व्यक्ती होम क्वॉरेन्टाईनमध्ये असून 40 व्यक्तींचा 14 दिवसांचा क्वॉरेन्टाईन कालावधी पूर्ण झाला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here