पीलीभीत च्या साखर कारखान्यांवर 551 करोड रुपये उस थकबाकी

पीलीभीत : साखर उद्योग कोरोनाशी झुंजत आहे. आणि उत्पनाच्या च्या कमीचाही सामना करत आहे. ज्यामुळे कारखाने ऊस थकबाकी भागवण्यातही असमर्थ झाले आहेत. जिल्ह्यातील दोन खाजगी आणि दोन सहकारी साखर कारखान्यांजवळ ऊस शेतकर्‍यांचे जवळपास 551.80 करोड रुपये देय आहेत. शेतकरी आता पैसे मिळण्यासाठी राज्य सरकारला मध्यस्थी करण्याची मागणी करत आहेत.

टाइम्स ऑफ इंडिया ने प्रसारित केलेल्या बातमी नुसार ,10 जून च्या ऊस विभागाच्या नोंदीनुसार, पीलीभीत येथील चार साखर कारखान्यांनी 25 एप्रिल पासून 19 मे दरम्यान गाळप हंगाम बंद केला आहे. दरम्यान, राष्ट्रीय लोकदल (आरडीएल) चे राज्य उपाध्यक्ष मनजीत सिंह यांनी सांगितले की, शेतकर्‍यांना अलीकडेच गहू खरेदीच्या दरम्यान आधीच नुकसानीचा सामना करावा लागत आहे, कारण सरकारच्या न्यूनतम समर्थन मूल्याच्या खूपच कमी दरावर आपले उत्पादन विकण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. आता, ऊस मूल्याच्या मोठ्या प्रमाणावर थकबाकीने शेतकर्‍यांना आर्थिक संकटात टाकले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here