उत्तर प्रदेशमध्ये ऊसाच्या उत्पादकतेत प्रती हेक्टर चार क्विंटलची वाढ

160

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये उसाच्या उत्पादकतेमध्ये प्रती हेक्टर चार क्विंटलची वाढ झाली आहे.
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तामुळे उत्तर प्रदेशमध्ये २०२०-२१ मध्ये सरासरी ऊस उत्पादन ८१५ क्विंटल प्रती हेक्टर झाले आहे. त्यामुळे ऊस शेतीला नवे बळ मिळाले आहे. गेल्या वर्षी सरासरी ऊस उत्पादन ८११ क्विंटल प्रती हेक्टर होते. त्यामध्ये यावर्षी प्रती हेक्टर चार क्विंटलची वाढ झाली आहे.

उत्तर प्रदेशच्या पश्चिम क्षेत्रामध्ये शामली जिल्हा १००४ क्विंटल प्रती हेक्टर ऊस उत्पादन करून यादीत अव्वल क्रमांकावर आले. त्यानंतर मुझफ्फरनगरमध्ये ९२३.२० क्विंटल प्रती हेक्टर नोंद झाली आहे. उर्वरीत दहा जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे पश्चिम उत्तर प्रदेशातील आहेत. राज्यात एकूण ४५ जिल्ह्यात ऊस उत्पादन केले जाते.

ऊस विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय भूसरेड्डी यांनी सांगितले की, उच्च प्रतीच्या ऊस पिकाच्या उत्पादनामुळे २०२०-२१ च्या हंगामात करण्यात आला होता. वेळेवर दिली गेलेली ऊस बिले आणि शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाशी जोडले गेल्यामुळे उसाच्या उत्पादनात वाढ झाली आहे.

ऊस आयुक्तांनी सांगितले की राज्याच्या सरासरी उत्पादकतेमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे विभागीय स्तरावर तसेच ग्रामीण स्तरावर कार्यरत असलेले ऊस उत्पादक, अधिकारी, कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. ऊसाच्या शेतीमध्ये उत्पादकता वाढीस त्यांचे प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here