बिजनौर: साखर कारखाने नोव्हेंबर मध्येच भागवणार शंभर टक्के थकबाकी

बिजनौर, उत्तर प्रदेश: जिल्हयातील दोन साखर कारखाने आज गेल्या गाळप हंगामाची शंभर टक्के थकबाकी भागवतील. दोन कारखान्यांनी नोव्हेंबरमध्ये च थकबाकी भागवण्याबाबत सांगितले. चार साखर कारखाने डिसेंबर मध्ये थकबाकी भागवतील. बिलाई साखर कारखान्याला थकबाकी भागवण्यासाठी प्रशासनाला शेड्यूल देण्याबाबत सांगण्यात आले आहे.

मंगळवारी डीएम रमाकांत पांडये यांनी कारखाना अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. त्यांनी सांगितले, नवा गाळप हंगाम सुरु झाला आहे आणि शेतकऱ्यांचे गेल्या गाळप हंगामातील ऊसाचे पैसे अजूनही देय आहेत. साखर कारखाना अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर थकबाकी भागवावी. बुंदकी व बहादरपुर कारखान्याने बुधवार पर्यंत पैसे भागवण्याचे सांगण्यात आले आहे. धामपूर कारखान्याने 30 नोव्हेंबर पर्यंत व स्योहारा कारखान्याने 27, 28 नोव्हेंबर पर्यंत पैसे भागवण्याबाबत सांगितले आहे. बरकातपुर कारखान्याने 12 करोड रुपये याच महीन्यात शंभर टक्के थकबाकी डिसेंबर मध्येच भागवण्याबाबत सांगितले. बिजनौर आणि चांदपुर नेही शंभर टक्के थकबाकी डिसेंबर मध्ये भागवण्यास सांगितले आहे.

नजीबाबाद साखर कारखान्याने सांगितले की, पैसे भागवण्यासाठी कारखान्याकडून सीसीएल मागितले आहे. सीसीएल मंजूर झाल्यावर थकबाकी भागवली जाईल. बिलाई साखर कारखान्याने साखर विकून पैसे भागवण्यास सांगितले.

अवध साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची गेल्या वर्षाची थकबाकी या आठवड्यात भागवली जाईल. शेतकऱ्यांची थकबाकी भागवण्याची एडवाइज बनवण्यात आली आहे. गुरुवार पासून बँकांमध्ये शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे जमा होणे सुरु होईल.

भाकियू चे ब्लॉक अध्यक्ष चौधरी गजेंद्र सिंह टिकैत यांनी सांगितले की, यूनियन च्या शिष्टमंडळानेही साखर कारखाना अधिशासी अध्यक्षांची भेट घेतली. त्यांनी दोन दिवसात शेतकऱ्यांची पूर्ण थकबाकी भागवण्याचे आश्वासन दिले. यावेळी गज राम सिंह, राम चरण सिंह, इस्लामुद्दीन, आलोक कुमार, विनीत चौहान, देवेंद्र सिंह, अनुज बालियान आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here